👁 9 Views

कौठाळी येथे विवाह संपन्न होताच वधु-वरांनी वृक्षारोपण करुन दिला निसर्गसंवर्धनाचा संदेश

Pandharpur Live –

कौठाळी:निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे हे ओळखून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कौठाळी तालुका पंढरपूर येथे वधू वरांच्या हस्ते  वृक्षारोपण करुन विवाह सोहळा झाला. शासनाच्या वतीने दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून या अभियानाला प्रतिसाद देत नवविवाहित वधू-वरांनी मिळून वृक्षारोपन करत निसर्गसंवर्धनाचा संदेश दिला.

कौठाळी येथील परमेश्वर नामदेव धुमाळ यांची कन्या स्नेहा व चिलाईवाडी येथील अभिमान धोंडीराम शेळके यांचे चिरंजीव दीपक यांचा विवाह सोहळा सोशल डिस्टंसिंन चे पालन करत मोजक्याच लोकांमध्ये करण्यात आला.
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!
प्रारंभी दोन्ही वधूवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या विवाह सोहळ्यास प्रारंभ झाला. त्यानंतर सामाजिक अंतर ठेवत बँड डॉल्बी मंडप डिजे या सर्व गोष्टींना फाटा देत साधेपणाने घरातच सात फेरे घेऊन विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. ह्यावेळी वधूवरांना व उपस्थित मोजक्याच लोकांना मास्क परिधान करून सॅनिटायझर ची व्यवस्था करण्यात आली होती. प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करत हा विवाह सोहळा पार पडल्याचे दिसून आले.
 
या विवाह सोहळ्यासाठी सरपंच शंकर गोडसे, माजी सरपंच महादेव गाढवे, उपसरपंच नामदेव लेंडवे, माजी उपसरपंच अरुण धुमाळ, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष ईश्वर धुमाळ, माजी सैनिक पांडुरंग धुमाळ, अरुण नागटिळक, शिवक्रांती परिवाराचे अध्यक्ष रामदास नागटिळक आदी उपस्थित होते.



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *