👁 11 Views

श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा


Pandharpur Live –

               पंढरपूर- गोपाळपूर(ता.पंढरपूर)येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या अंतर्गत येणाऱ्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पॉलीटेक्निक, पदवी व पदविका फार्मसी या चारही महाविद्यालयांमध्ये १० ते १५ व्यक्तींच्या सहभागातून व सोशल डिस्टन्सिंग पाळून आज दिनांक २१ जून २०२० रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, सर्व अधिष्ठाता व विभागप्रमुख उपस्थित होते. तसेच ऑनलाईन माध्यमाद्वारे (गुगल मीट / फेसबुक  लाइव्ह स्ट्रीमिंग ) सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकडून ‘परिवार के साथ योगा ऍट होम’ साजरा करण्यात आला. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

योगामुळे मन, बुध्दी आणि शरीर यांचा उत्कृष्ट समन्वय साधला जातो तसेच शारीरिक व मानसिक तणाव कमी होण्यास योगामुळे मदत होते आणि मानवी जीवन अधिक उत्साही बनते. एकूणच योग केल्याने उत्साह आणि एकाग्रता वाढीस लागते. योगाचे हे महत्व लक्षात घेऊन स्वेरीने पूर्वीपासूनच आपल्या वेळापत्रकात रोज अर्धा तास योगासाठी राखीव ठेवलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयात प्रवेश करण्यापूर्वी उपस्थित मोजक्या व्यक्तींची थर्मल स्कॅनर च्या मदतीने तपासणी करण्यात आली होती. तसेच ठीक ठिकाणी सॅनिटायझरची देखील व्यवस्था करण्यात आली होती. 
आज पार पडलेल्या या योग सत्राचे उदघाटन स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.अभय उत्पात यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. सुरुवातीला वार्म अप घेण्यात आले व त्यानंतर भस्रिका, अनुलोम विलोम, कपालभाती, भ्रामरी आदी योग क्रिया करण्यात आल्या. योगाच्या या उपक्रमाचे सूत्रसंचालन व प्रात्यक्षिक प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर स्वेरीचे विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *