👁 11 Views

“कर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेज, शेळवे येथे सर्व शिक्षकांसाठी e-content डेव्हलपमेंट डिलिव्हरी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन”

Pandharpur Live –

          श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलितकर्मयोगी इंजीनियरिंग कॉलेजशेळवेपंढरपूर यांनी माध्यमिक,  उच्च माध्यमिकपदवी आणि पदव्युत्तर शिक्षकांसाठी सहा दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील  सर यांच्या मार्गदर्शनाखाली  समन्वयक  उपप्राचार्य जगदीश मुडेगावकर  सहसमन्वयक प्रा अनिल बाबरप्रा.सारंग कुलकर्णी प्रा.अतुल सुतार यांनी केले आहे.

          या कार्यशाळेमध्ये इ कन्टेन्ट डेव्हलपमेंट अँड डिलिव्हरी ह्या विषयावर दररोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळेमध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे शिकवता येईल याबद्दलचे सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मा..प्रशांतरावजी परिचारक यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली असून कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील  यांनी केले. कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व  सहभागी शिक्षकांचे स्वागत  प्रा सारंग कुलकर्णी  यांनी केले. सहा दिवसाच्या या कार्यशाळेमध्ये प्रमुख मार्गदर्शक   प्रा डॉ गणेश मुडेगावकरप्रा. जगदीश मुडेगावकर,  प्रा. अनिल बाबरप्रा.अभिनंदन देशमानेडॉ संगीता पाटील मॅडम मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेमध्ये कमी खर्चामध्ये फक्त आपला अँड्रॉइड फोन वापरून विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रतीचे e-content तयार करण्याच्या दृष्टीने ई-मेल अकाउंटफोन कॉन्फरन्सिंगगुगल फॉर्मएक्सेल शीट मधील फोन नंबर अँड्रॉइड फोन मध्ये घेणेझूम ॲप चा वापरऑडिओ रेकॉर्डिंगव्हिडिओ रेकॉर्डिंगव्हिडिओ एडिटिंगवर्डएक्सेल,  पॉवरपॉईंट या विषयावर सखोल मार्गदर्शन होणार आहे. COVID-19 च्या संसर्ग परिस्थिती नंतर विद्यार्थी आणि पालकांची मानसिकता काय असेल आणि अशा मानसिकतेला अनुसरून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन कसे करावे  याबद्दलचे  मार्गदर्शन मानसोपचार तज्ञ  डॉक्टर  संगीता पाटील मॅडम या करणार आहेत.

Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

          या कार्यशाळेस तीनशेपेक्षा अधिक शिक्षकांची नोंदणी झाली असून शिक्षक ऑनलाइन पद्धतीने कार्यशाळेमध्ये सहभागी होत आहेत आणि कार्यशाळेच्या समाप्तीनंतर शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात येणार आहे असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील सर यांनी सांगितले.या कार्यशाळेसाठी मा .श्री.प्रशांत परिचारक यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या आहेत तसेच शिक्षकांनी येणाऱ्या परीस्थितीवर मात करण्यासाठी सज्ज राहावे व नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यावे असे संबोधन केले आहे.

          काळानुरूप समाजाची हित ग्राह्य धरून कर्मयोगी इंजिनिअरिंग कॉलेज सदैव उपक्रम राबवत असतो या उपक्रमासाठी समन्वयकसह समन्वयकशिक्षकशिक्षकेतर कर्मचारी यांचे योगदान मोलाचे आहे असे कॉलेजचे प्राचार्यडॉ.श्री.एस.पी.पाटील यांनी सांगितले. ऑनलाइन कार्यशाळेचे तंत्रज्ञान व्यवस्थितपणे कार्यरत करण्यासाठी प्रा दिपक भोसले  यांनी उल्लेखनीय योगदान देत आहेत असे उपप्राचार्य  मुडेगावकर यांनी सांगितले.

          उपस्थितांचे आभार मेकॅनिकल विभागाचे विभाग प्रमुख प्रा राहुल पांचाळ यांनी मानले.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *