Pandharpur Live– आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार सोलापूर महापालिका हद्द वगळता जिल्हयाच्या विविध तालुक्यात एकुण रूग्णसंख्या 587 एवढी झाली आहे. यापैकी 27 रूग्णांचा मृत्यू झाला असुन 241 रूग्ण बरे झाले आहेत तर एकुण 319 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. पंढरपूर तालुक्यात आज 3 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी पंढरीतील गोविंदपूरा भागातील 1 व जुनी कोळी गल्ली येथील 1 आहे तर एकजण गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील आहे.
पंढरपूर तालुक्यातील आजपर्यंत 38 पाॅझिटीव्ह रूग्ण आढळून आले. यापैकी 8 बरे झाले असुन 30 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी 23 रूग्ण CCC वाखरी येथे तर 5 रूग्ण सोलापूर व 1 रूग्ण पुणे येथे तसेच 1 रूग्ण सांगोला येथे उपचार घेत आहे. एकुण 98 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते यापैकी तिघांचे अहवाल आज पॉझिटीव्ह आले आहेत. अद्याप 95 अहवाल प्रलंबित आहेत.- डॉ. एकनाथ बोधले (पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी)
तालुकानिहाय रूग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे.
- अक्कलकोट– एकूण आढळून आलेले रूग्ण- 116, मृत्यू- 7, बरे झालेले- 31, उपचार सुरू असलेले- 78
- बार्शी– एकूण आढळून आलेले रूग्ण- 110, मृत्यू- 5, बरे झालेले- 42, उपचार सुरू असलेले- 63
- करमाळा– एकूण आढळून आलेले रूग्ण- 6, उपचार सुरू असलेले- 6
- माढा– एकूण आढळून आलेले रूग्ण- 12, मृत्यू- 1, बरे झालेले- 6, उपचार सुरू असलेले- 5
- माळशिरस– एकूण आढळून आलेले रूग्ण- 6 , बरे झालेले- 5, उपचार सुरू असलेले-1
- मंगळवेढा– एकूण आढळून आलेले रूग्ण- 1
- उपचार सुरू असलेले- 1
- मोहोळ– एकूण आढळून आलेले रूग्ण- 29, मृत्यू- 4, बरे झालेले- 12, उपचार सुरू असलेले- 13
- उत्तर सोलापूर– एकूण आढळून आलेले रूग्ण- 61, मृत्यू- 2, बरे झालेले- 22, उपचार सुरू असलेले- 37
- पंढरपूर– एकूण आढळून आलेले रूग्ण- 38, बरे झालेले-8, उपचार सुरू असलेले- 30
- सांगोला– एकूण आढळून आलेले रूग्ण- 4, मृत्यू-1, बरे झालेले- 2, उपचार सुरू असलेले- 1
- दक्षिण सोलापूर– एकूण आढळून आलेले रूग्ण- 210, मृत्यू- 7, बरे झालेले- 114, उपचार सुरू असलेले- 89






