👁 7 Views

“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” ‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून; शासनाकडून गंभीर दखल, शांतता, संयम पाळण्याचे आवाहन- उपमुख्यमंत्री अजित पवार

Pandharpur Live –

            मुंबईदि.8 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून तपासकार्य सुरु केले आहे.

 आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या कुहेतूला बळी पडू नये. शांततासंयम पाळावाएकजूट कायम ठेवावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

            महामानव डॉ. बाबासाहेबांचे कार्य आणि विचार समाजमनात खोलवर रुजले आहेतआपल्या सर्वांची त्यांच्यावर भक्कम श्रद्धा आहेत्या श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाहीअसा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. 

Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *