पंढरपूर शहर व तालुक्यात आजपर्यंत शहर- 60, ग्रामीण-21 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 7 असे एकुण 88 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले होते. यापैकी शहरातील 16, ग्रामीण मधील 8 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 5 रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या पंढरपूर शहरातील 42, ग्रामीण मधील 13 तर इतर तालुका व जिल्ह्यातील 2 अशा एकुण 57 बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरातील दोन कोरोना बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
आज एकुण 24 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत यामध्ये शहरातील 16 जणांचा व ग्रामीण मधील 8 जणांचा समावेश आहे. आज गजानन महाराज मठात 55 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले आहेत. अशी माहिती पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे.




