आज पंढरपूर तालुक्यात एकुण 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकुण 359 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यापैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एकुण 120 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 234 जणांवर उपचार सुरू आहेत.
अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे.



