👁 7 Views

पायोनियर कंपनीच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांना मक्का पेरणी यंत्राचे वाटप… मका लागवड मशिनमुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढेल!- सचिन गाढवे

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यात मक्का पिकाची खरीप आणी रब्बी  हंगामात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मक्का पिकाचा समावेश उत्पादन आणि शेतीला पूरक असलेला दुग्ध व्यवसाय करताना जनावरांना चारा  म्हणून मोठ्या प्रमाणात होतो. आपल्या पंढरपूर तालुक्यातही मक्का पिकाची  लागवड  मोठ्या प्रमाणात होते. ही लागवड होत असताना बियांची संख्या  योग्य अंतरावर पडावी आणी शेतकरी बांधवांना मक्का पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे या उद्देशाने नुकतेच तालुक्यातील शेतकरी बांधवांना मका पेरणी यंत्राचे वाटप पंढरपूर तालुका मंडल कृषि अधिकारी  श्री आर.डी . घेरडे यांच्या  हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पायोनियर कंपनीचे अधिकार श्री सचिन गाढवे उपस्थित होते. 

या मका लागवड मशिनमुळे शेतकरी बांधवांचे उत्पन्न वाढेल आणि मजुरीचा खर्च नक्कीच कमी होईल. असा विश्वास सचिन गाढवे यांनी व्यक्त केला.  त्याच बरोबर शेतकरी बांधवांनी दर्जेदार पायोनियर मका वाणाची  लागवड करून भरघोस उत्पादन आणी जनावरांसाठी दर्जेदार  चार्‍याचे उत्पादन घ्यावे असा मनोदय व्यक्त केला.

लाभार्थी शेतकरी सुखदेव गायकवाड म्हणाले की, हे पेरणी यंत्र ‘कोरटेवा पायोनियर’ ने दिल्यामुळे उत्पादन तर वाढेलच त्याबरोबर मजुरीचा खर्च आणि वेळेची बचत होईल. कृषी अधिकारी श्री.घेरडे यांनी कंपनीच्या या स्तुत्य उपक्रमाचे विशेष कौतुक केले . या प्रसंगी श्री. दिपक राजमाने, मारूती कोळी, उमेश उजगरे,  प्रकाश पवार, भास्कर कुसुमडे, हाणुमंत गायकवाड, नारायण गायकवाड आणी लाभार्थी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *