👁 8 Views

विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वी चा निकाल 99.54% ; उज्वल यशाची परंपरा कायम!


पंढरपूर (प्रतिनिधी):- श्री. दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पंढरपूर चा 12 वीचा निकाल 99.54% लागला असुन या परीक्षेत महाविद्यालयातील एकुण 440 पैकी 438 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शास्त्र शाखा- 99.22%, कला शाखा- 100% तर वाणिज्य शाखेचा निकाल 100% लागला आहे. तसेच किमान कौशल्य विभागाचा निकाल 86.51% लागला आहे. एकुणच महाविद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
12 वी विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक कु. सिध्दी गिरीष चाकोते (91.07%), द्वितीय क्रमांक चि. तेजस वैभव टोमके (86.46%), तृतीय क्रमांक चि. रोहन नवनाथ सुरवसे (86.30%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.
12 वी कला शाखेत प्रथम क्रमांक कु. कोमल दत्तात्रय माळी (83.23%), द्वितीय क्रमांक कु. कांचन विष्णू खिलारे (81.07%), तृतीय क्रमांक चि. सागर राजेंद्र करचे (75.69%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.
12 वी वाणिज्य शाखेत प्रथम क्रमंाक चि. शंकर प्रमोद महामुनी (87.38%), द्वितीय क्रमांक कु. ॠतुजा पिराजी मोरे (86.76%/ मराठी-93, बी.के. 100), तृतीय क्रमांक कु. नेहा सचिन माने (84.92%/ बी.के.99) यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. 
किमान कौशल्य- प्रथम क्रमांक चि. मोरे तुषार मुकूंद (76.62%), द्वितीय क्रमांक कु. तांबोळी करीना शहाजहान (76.54%), तृतीय क्रमांक कु. कोळी आरती तुकाराम (72.92%) यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे. 
संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर,  उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, सचिव अ‍ॅड. वैभव टोमके, संस्थेचे सर्व संचालक, सदस्य,
 प्र.प्राचार्य बाळासाहेब भुताडे , विभाग प्रमुख मुंढे यु.आर., केंदुळे डी.डी. यांनी तसेच, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी  यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *