👁 12 Views

कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन; प्रशासनाकडून होणार दंडात्मक कारवाई – जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केले आदेश


            सोलापूर, दि.3: सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

            नागरिकांनी सार्वजनिक स्थळीकामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावेचेहऱ्यावर मास्क/रूमाल वापरणे बंधनकारक आहे. स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाकडोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाहीयाची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नयेअसे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये दुचाकीवर दोघेजन हेल्मेट व मास्कसह, तीन चाकी वाहनात चालक व इतर दोन, चार चाकी वाहनात चालक व इतर तिघे आणि टॅक्सी/कॅब/ॲग्रीगेटर चालक व इतर तिघांना परवानगी असेलअसे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

        उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल

अ.क्र.

उल्लंघनाचे स्वरूप

आकारण्यात येणारा दंड

1

मास्क न वापरल्यास

100 रूपये

2

दुचाकीवर तिघांनी प्रवास केल्यास

500 रूपये (वाहन चालका)

3

तीन चाकी वाहनात तीनपेक्षा अधिक व्यक्ती बसलेल्या आढळल्यास

500 रूपये (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)

4

चारचाकी वाहनातून चारपेक्षा जास्त जणांनी प्रवास केल्यास

500 (वाहन चालकांकडून प्रती व्यक्ती)

5

निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यास (अत्यावश्यक सेवा वगळून)

एक हजार दंड.

दोनवेळा दंड झाल्यास तिसऱ्यावेळी दुकानाचा परवाना 15 दिवसासाठी निलंबित.

6

साठ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले मालक किंवा नोकर दुकाने/ आस्थापनामध्ये आढळल्यास

सात दिवसांपर्यंत दुकान सील

7

दुकानात पाचपेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास

500 रूपये आणि दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास 1000 रूपये.

8

होम क्वारंटाईन योग्य रितीने न पाळल्यास

एक हजार रूपये.

9

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास

200 रूपये

10

सुरक्षित अंतर न ठेवल्यास

100 रूपये (प्रत्येकी)

11

सार्वजनिक ठिकाणी दारूपानतंबाखूचे सेवन केल्यास

500 रूपये.

12

दुकानदार/व्यावसायिक/फिरते फळ व भाजी विक्रेते मास्क न वापरल्यास

100 रूपये.

 

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तालुकास्तरावर तहसीलदारनायब तहसीलदारमंडल अधिकारीपोलीस प्रशासनगट विकास अधिकारीविस्तार अधिकारी (आरोग्य)नगरपालिका मुख्याधिकारीस्वच्छता निरीक्षकतलाठीग्रामसेवक यांनी कोविड उपाययोजना नियम 2020 अन्वये दंडात्मक कारवाई करावीअसेही त्यांनी आदेशात नमूद  करण्यात आले आहे.

 

                                                                               0000000000


         

 शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे

गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

 

           सोलापूर,दि.3 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे 10वी, 12वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रमात साठ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एल.एस. क्षीरसागर यांनी केले आहे. 

 

            त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाज व तत्सम बारा पोट जातीतून गरजू व होतकरु विद्यार्थी, विद्यार्थींनींनी 14 ऑगस्ट 2020 पर्यंत अर्ज करावा. अर्जासोबत 2018-19 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेले गुणपत्रिका, शाळा सोडलेला दाखला, जातीचा दाखला, पुढील वर्षात प्रवेश घेतल्याची पावती, रेशनकार्ड आदी कागदपत्रे जोडावीत. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता,शासकीय विश्रामगृहाच्या मागे, सोलापूर येथे संपर्क साधावा. ई-मेल आयडी dmlasdcsolapur@gmail.com या ईमेलवर अथवा दूरध्वनी क्रमांक 0217-2311523 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *