👁 9 Views

‘रक्तदान हे श्रेष्ठदान वाचवतो इतरांचे प्राण!’ या आवाहनाला प्रतिसाद देत 605 रक्तदात्यांनी केले रक्तदान! धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत (आबा) पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम

डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रमातून अभिजीत आबा फाऊंडेशनने पंढरपूर  तालुक्याच्या विविध भागात लोकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन विक्रमी रक्तदान केले . ‘रक्तदान हे श्रेष्ठदान वाचवतो इतरांचे प्राण!’ हा संदेश घेऊन केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत एकूण 605 रक्तदात्यांनी रक्तदान केले. याचबरोबर तालुक्यातील विविध ठिकाणी वृक्षारोपनही केले जात आहे.
धाराशिव साखर कारखाना युनिट1,2,3 चे चेअरमन  अभिजीत (आबा) पाटील यांच्या 37 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुक्यात विविध ठिकाणी अभिजित (आबा) पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसापासुन रक्तदान होत आहे. आज पटवर्धन कुरोलीत 103 तर विसावा आढीव येथे 52 जणांनी रक्तदान केले. 
डिव्हीपी उद्योग समूह नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो .जागतिक कोरोनाच्या या संकट काळात आज रक्ताचा तुटवडा भासत आहे. रक्तदान शिबीर व सामाजिक उपक्रम राबवून एक नवा आदर्श ठेवला आहे. ह्या संकल्पनेला मित्र परिवारांनी भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल श्री.अभिजीत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *