पंढरपूर (प्रतिनिधी):- विवेक वर्धिनी विद्यालय, पंढरपूर मधील इयत्ता 10 वीच्या परीक्षेत बसलल्या एकुण 275 विद्यार्थ्यांपैकी एकुण 268 विद्यार्थी पास झाले आहेत. प्रशालेचा निकाल 97.45% लागला आहे. प्रथम क्रमांकाने ओंकार दत्तात्रय माळी (97.20%), द्वितीय क्रमांकाने यश भारत गायकवाड (96.20%) तर तृतीय क्रमांकाने साक्षी पिंटू भानवसे (95.40%) यांनी यश संपादन केले आहे.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांकाने कल्याणी सरवदे 94.20 %, द्वितीय क्रमांकाने नेहा कांबळे 91.60%, तृतीय क्रमांकाने स्वराली कांबळे 90.60% यांनी यश संपादन केले आहे. तसेच 90% पेक्षा जास्त गुण मिळवुन श्रेया गणेश निर्मळे 91.80%, शंभूराजे उदय वाडदेकर 90.40%, ओंकार अतुल कारंडे 90.20%, अभिषेक चंद्रकांत देवरे 90%, चैतन्य राजेंद्र झरकर 90% या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
विशेष प्राविण्य घेत उत्तीर्ण झालेले एकुण 69 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत एकुण 110 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 79 विद्यार्थ्यांनी उल्लेखणीय यश संपादन केले आहे. याचबरोबर विवेक वस्तीगृहाचा निकालही 100% लागला आहे.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. मदन क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रा. शिवाजी वाघ, सचिव अॅड. वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगांवकर, जेष्ठ संचालक ब.म.भरले गुरुजी, मुकूंद देवधर, अप्पासाहेब चोपडे, विजयकुमार माळवदकर, दिलीप (आप्पा) घाडगे, बाळासाहेब सालविठ्ठल, शोभाताई मोरे व सुनिता मोरे तसेच प्र. प्राचार्य बाळासाहेब भुताडे, जेष्ठ शिक्षक सुनील पाटील, अधीक्षक अमोल हुंगे, तंत्र विभाग प्रमुख नानासाहेब देवकते, मुख्य लिपिक हनुमंत मोरे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.