👁 10 Views

धक्कादायक… पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अमिन अप्पा मुलाणी यांचे कोरोनामुळे निधन


पंढरपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस नाईक अमिन आप्पा मुलाणी (वय 50, रा. पोलीस लाईन, पंढरपूर)  यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले आहे. सोलापूर मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

मुलाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे.  त्यांच्या मुलीचे नुकतेच लग्न ठरले होते आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. परंतु काळाने अचानक मुलाणी यांना ओढुन नेले. कुटुंबातील एकमेव आधार गेला. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या अमिन मुलाणी यांच्या मृत्युमुळे पोलीस दलातुन हळहळ व्यक्त होत आहे.

पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे एकुण 4 पोलीस कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असुन एकाचे असे दुःखद निधन झाले आहे तर एकावर उपचार सुरू आहेत,  असे समजते. 

पंढरपूर शहरातील पोलीसाचा कोरोनामुळे पहिला बळी गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कायदेशीर मदत मिळणे अपेक्षित आहे. 

मुलाणी यांना पंढरपूर लाईव्ह कडून भावपुर्ण श्रध्दांजली.  

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *