👁 5 Views

कर्मयोगी अभियांत्रिकी मध्ये ”उद्योजकतेचा विकास” विषयावर कार्यशाळा संपन्न


श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयामध्ये करिअर गायडन्सच्या अंतर्गत दि. 3 मे 2023 रोजी “उद्योजकतेचा विकास” या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. साज कन्सल्टन्सी सर्विसेस सोलापूर चे संचालक श्री एस .ए.जेऊरकर यांनी उपस्थितांना या कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांच्या हस्ते झाले. सुरूवातीला प्रा. उदय कारवेकर यांनी प्रास्ताविक व वक्त्याची ओळख करून दिली.


कार्यशाळेत बोलताना श्री एस.ए.जेऊरकर यांनी सर्वप्रथम उद्योजकता व उद्योजक या मधला फरक समजावून सांगितला. त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राची त्यांनी सविस्तर माहिती दिली. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते तसेच किती धनराशी जिल्हा उद्योग केंद्र कडून दिली जाते याची सविस्तर माहिती देऊन त्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. पंतप्रधान मुद्रा लोन योजना, स्टार्ट अप इंडिया इत्यादी वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन मुलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रेरित केले. कार्यशाळे विषयी बोलताना कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील म्हणाले कि या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी निश्चितच फायदा होईल. विद्यार्थ्यानी ज्ञान संपादन करून त्याचा उपयोग उद्योग्जकतेमध्ये करावा व आपला स्वता:चा व पर्यायाने समाजाचा विकास साधावा. कर्मयोगीमद्धे यासंबंधीचे असे अनेक उपक्रम भविष्यामद्धे राबविण्यात येतील अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली.  सदरच्या कार्यशाळेचे सूत्रसंचालन कॉलेजची विद्यार्थिनी कल्याणी घाडगे व विद्यार्थी चैतन्य पताळे यांनी केले. 


श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांनी कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या. सदरच्या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशीष जोशी, तसेच विभागप्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते. प्रा. सचिन शिंदे यांनी आभार मानून कार्यशाळेची सांगता केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *