सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ नेते, माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याने अनेकांच्या मनातील पांडुरंग स्वरूप असलेल्या राजकारणातील या संताचे अंतिम दर्शन सुध्दा कार्यकर्त्यांना घेता आले नाही. ही खंत अनेकांच्या मनात कायम राहील. परंतु पंढरपूर तालुक्यातील ग्रामस्थांसह पंढरपूरकरांना कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थिकलशाचे दर्शन आज घेता येणार आहे.अस्थिकलशाचे दर्शन सर्वांना घेता यावे यासाठीचे योग्य नियोजन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत.
नियोजनानुसार पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे यासाठी विभागनिहाय गट केले आहेत. पांडुरंग साखर कारखान्यातून अस्थिकलश गटनिहाय नेमलेल्या ठिकाणी नेले जाणार असुन याठिकाणी 45 मिनिटांसाठी दर्शनासाठी अस्थिकलश ठेवण्यात येणार आहेत. यानंतर सर्व अस्थिकलश पंढरपूर अर्बन बँकेत आणले जातील व नंतर चंद्रभागेत अस्थिंचे विसर्जन करण्यात येईल.
पंढरपूरकरांना अस्थिकलशाचे दर्शन घेता यावे यासाठी परिचारक यांच्या वाड्यात सकाळी साडे अकरा ते दुपारी 2 वाजेपर्यंत अस्थिकलश ठेवण्यात येणार आहेत.







