👁 12 Views

पंढरीतील समाजसेवक राजीव मोरे काळाच्या पडद्याआड…

पंढरपूर (प्रतिनिधी) :- पंढरपुरातील भटक्या विमुक्त चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, देशसेवेची परंपरा असलेल्या कुटुंबातील, नि:पक्ष, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकारातील तज्ञ, फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचे घनिष्ठ सहभाग असणारे, गोंधळी समाज भूषण, लोकप्रिय कार्यकर्ते राजीव उर्फ राजाभाऊ हनुमंतराव मोरे (वय60) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे. 

     त्यांच्या निधनाने पंढरपूर विभागातील भटक्या-विमुक्त चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. पंढरपुरातील गोरगरिबांच्या कोणत्याही अडीअडचणीला मदत करण्यास सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेले. पंढरपूर लाईव्हकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *