👁 12 Views

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद

            मुंबई, दि. 10 : विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महाविद्यालयीन  काळ अतिशय महत्त्वाचा असतो. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर सध्या हे सगळे वेळापत्रकच बदलेले आहे. त्यामुळे  विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच  स्वच्छतासामाजिक अंतर पाळणेआरोग्यआहार याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे असे क्रीडा राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी संगितले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटपिरंगुटपुणे येथील एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांशी  राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी    ऑनलाईन संवाद साधला.

            राज्यमंत्री तटकरे म्हणाल्याशिक्षणरोजगारकौशल्य विकासक्रीडा या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना कोविड-19 मुळे अनेक अडचणी येत आहेत. कोविडच्या  पार्श्वभूमीवर  विद्यार्थ्यांसाठी उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना पुढे कसा रोजगार उपलब्ध होईल यासाठी संबंधित विभागांचे मंत्रीराज्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विद्यार्थ्यांनीही कोविड काळात काळजी घ्यावी आणि कोविडच्या  सर्व नियमांचे पालन करावे,असेही राज्यमंत्री तटकरे यांनी सांगितले.

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी संपर्क
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *