पंढरपूर: कोरोना महामारीमुळे प्रशासकीय यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळण्यास झालेला विलंब पाहता अनेक जण अजून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित आहेत. याचा विचार करून प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी शासनाने आणखी एकदा मुदत वाढ दिली आहे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
‘महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई म्हणजेच एम.एस.बी.टी.ई. मार्फत चालवल्या जाणाऱ्या दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या रजिस्ट्रेशनसाठी आणखी एकदा मुदत वाढ मिळाली असून विद्यार्थ्यांना आता दि. २१ सप्टेंबर २०२० अखेर पर्यंत आपले ऑनलाईन अर्ज डीटीईच्या वेबसाईटवरून भरता येणार आहेत. या अगोदर रजिस्ट्रेशन करण्याची मुदत २५ ऑगस्ट पर्यंतच दिली होती. त्यात वाढ करून ०४ सप्टेंबर दिली होती त्यात आणखी वाढ केली असून विद्यार्थ्यांना आता २१ सप्टेंबर पर्यंत मुदत दिल्याने इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी संधी मिळणार आहे.’ अशी माहिती श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पॉलिटेक्निक) पंढरपूरचे प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ यांनी दिली. यानंतर तात्पुरती गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावरती दि.२४ सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.जर प्रवेश अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर त्याची दुरुस्ती दि.२५ ते २७ सप्टेंबर या दरम्यान करता येईल. यानंतर विद्यार्थ्यांना अंतिम गुणवत्ता यादी डीटीईच्या संकेतस्थळावर दि. २९ सप्टेंबर रोजी पाहता येईल. प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करून रजिस्ट्रेशन करता येणार आहे. मागील वर्षी राज्यातील केवळ चार डिप्लोमा कॉलेजमध्येच १०० टक्के ऍडमिशन झाले होते.
संपादक- भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)


