👁 12 Views

अनलॉक 5.0 : राज्यातील रेस्टॉरंट, बार, सिनेमा थिएटर्स उघडण्याची शक्यता! जाणुन घ्या लेटेस्ट माहिती


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-

ऑक्टोबरच्या सुरुवातीला राज्यात रेस्टॉरंट्स आणि बार सुरु करण्याचा निर्णय सरकार घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी आधी कार्यपद्धती ठरवण्यात येणार आहे. नेमके बार आणि रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना आतमध्ये जाण्याची परवानगी असेल? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचं काटेकोरपणे पालन करत सरकार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट्स व बार सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.

कोरोनामुळे सात महिन्यांपासून बंद असलेले राज्यातील रेस्टॉरंट व बार आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. याबाबत राज्य सरकारने तयार केलेली नियमावली हॉटेल व्यावसायिकांना मान्य असून याबाबत सरकारने सूचना, हरकती मागवल्या आहेत. त्यानंतर अंतिम नियमावली तयार होईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणे, मुंबई, औरंगाबाद व नागपूर येथील हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

सरकारची मार्गदर्शक तत्वे संबंधितांना पाठवली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. सहा महिन्यांच्या अबकारी करातून सूट देण्याबाबत सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज… केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
 दरम्यान, रेस्टॉरंट्स सुरु करण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या आर्थिक तिजोरीवरील भार कमी होऊ शकतो. तसेच अनेक लोकांच्या हाताला कामंही मिळू शकतं. तसेच रेस्टॉरंट्सच्या मालकांनाही यामुळे दिलासा मिळणार आहे.

अटींचे पालन बंधनकारक
रेस्टॉरंट सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने सर्व हॉटेल व्यावसायिक संघटनांना ‘एसओपी’ पाठविला असून त्यात अनेक अटी आणि शर्थी आहेत.

कोरोनाची लक्षणे नसणाऱ्यांच प्रवेश
ग्राहकांची तपासणी करावी लागणार
विनामास्क
ग्राहकांना प्रवेश नाही
बाटलीबंद पाणी
हॅण्ड सॅनिटायझर अनिवार्य
जेवणाचे बिल डिजिटल मोडने अदा करावे
दोन टेबलामध्ये एक मीटर अंतर हवे
पार्टिशन आवश्यक

  अनलॉकचा चौथा टप्पा ३० सप्टेंबरला संपून १ ऑक्टोबरपासून पाचव्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. या नव्या टप्प्यात सिंगल स्क्रिन, मल्टिप्लेक्स थिएटर तसेच नाट्यगृहे पुन्हा सुुरू करण्यास केंद्र सरकार परवानगी देण्याची तसेच आणखी पर्यटनस्थळे खुली होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे देशातील सात राज्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारा केलेल्या चर्चेमध्ये पंतप्रधानांनी मायक्रो-कंटेनमेन्ट झोन स्थापन करण्याची संकल्पना मांडली.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 

संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *