👁 8 Views

चंद्रभागेच्या घाटाची भिंत अंगावर कोसळल्याने 6 जणांचा बळी… पंढरीतील अभंगराव कुटुंबातील चौघांसह 2 बेवारस महिलांचा करूणाजनक मृत्यू…


चंद्रभागेच्या तीरावरील कुंभार घाटानजीकची भिंत कोसळली.  पाच ते सहा जण कोसळलेल्या भिंतीच्या ढिगा-याखाली दबले गेल्याची दुर्घटना आज दुपारी घडली होती.  या दुर्घटनेतील बळी गेलेल्या 6 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. 

पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन घाट बांधून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाकडून हे घाट बांधणीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. चुना वापरून दगडाचे बांधकाम केलेले आहे. मात्र कुंभार घाटावर असणार हे बांधकाम तिथेच राहणाऱ्या काही लोकांच्या अंगावर कोसळले. या घाटाचे काम निकृष्ठ दर्जाचे केले असल्याची चर्चा आहे. 

पंढरपूर लाईव्ह- आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेच्या तिरावरील बांधकाम सुरू असलेल्या कुंभार घाटानजीकची एक भिंत कोसळणा-या पावसात ढासळली. या दुर्घटनेत पावसामुळे भिंतीच्या आश्रयाला थांबलेले पाच ते सहा जण ढिगा-याखाली अडकुन पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. ही भीती खरी ठरली असुन बचाव कार्य सुरू असताना 6 जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. 

मृतांमध्ये पंढरीतील अभंगराव कुटुंबातील चौघांसह दोन वयोवृद्ध बेवारस महिलांचा समावेश असल्याचे समजते.

गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय अंदाजे 78), त्यांची पत्नी राधा गोपाळ अभंगराव (वय अंदाजे 70), त्यांचा मुलगा मंगेश गोपाळ अभंगराव (वय अंदाजे 32) व नातु संग्राम उमेश जगताप (वय अंदाजे 16) या एकाच कुटुंबातील चौघांचा व दोन वयोवृद्ध  बेवारस महिलांचा या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

दुपारी घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी सचिन ढोले, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व उप मुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले होते.

 ढिगारा जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आला असुन.  ढिगा-याखाली अडकुन पडल्याने एकुण 6 जणांचा बळी गेला आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *