पुणे येथील ‘भारत फोर्ज’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील उमेश बटेश्वर गुरव, कृष्णा राजेंद्र ताटे-देशमुख, अविनाश अर्जुन देवमारे, सचिन रामचंद्र गोसावी, बालाजी विठ्ठल लांडगे, नागेश सुधाकर रोंगे व रोहित पांडुरंग साखरे या सात विद्यार्थ्यांची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागातील तज्ञ प्राध्यापकांच्या सहकार्याने व विशेष प्रशिक्षित तज्ञांच्या सखोल अभ्यासातून कंपनीसाठी ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे व प्रा.एस.व्ही. दर्शने आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
छायाचित्र- ‘भारत फोर्ज’ मध्ये निवड झालेले स्वेरीचे विद्यार्थी अनुक्रमे उमेश गुरव, कृष्णा ताटे-देशमुख, अविनाश देवमारे, सचिन गोसावी, बालाजी लांडगे, नागेश रोंगे, रोहित साखरे.


