👁 11 Views

पंढरपूर सिंहगडच्या १३ विद्यार्थ्याची “यशस्वी ग्रुप ” कंपनीत निवड


 पंढरपूर : प्रतिनिधी –कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या १३ विद्यार्थ्यांची “यशस्वी ग्रुप” प्रा. लि. कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयातील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


       एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर स्थापनेच्या पहिल्या वर्षापासूनच शैक्षणिक निकालाच्या बाबतीत विद्यापीठात सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी एक आहे. शैक्षणिक गुणवत्ता हि प्रत्येक वर्षी वाढत असून प्लेसमेंट च्या बाबतीत महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिले आहे. यावर्षी सुद्धा दर्जेदार बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्याना प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाल्या आहेत. महाविद्यालयात सुसज्ज पायाभूत आणि शैक्षणिक सुविधा तसेच उच्च प्रतीचे तणावमुक्त आणि विद्यार्थीकेंद्रित शिक्षण ही सिंहगड ची ओळख बनलेली आहे.



    महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील श्रद्धा गवळी आणि मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील रेवण देवमारे, गायत्री पाटील, नागेश कोरे, अक्षय गोरे, आकाश वाघमारे, योगीराज कुलकर्णी, नितीन यादव, महादेव बागल, सुहास कदम, अतुल पवार, सचिन होनमाने, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील शुभम सासवडे आदी विद्यार्थ्यांची पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.  
    कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, प्लेसमेन्ट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ.अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. अतुल कुलकर्णी, भारत आदमिले आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-र्यानी अभिनंदन केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *