Pandharpur Live :- पंढरपूर दौर्यावर असलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज सरकोली, (ता.पंढरपूर) येथे जाऊन दिवंगत आमदार (कै.) भारतनाना भालके यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन केलं. यानंतर शरद पवार यांनी भाषण करताना विविध मुद्द्यांना स्पर्श करत विठ्ठल परिवाराने एकत्रीत राहणे गरजेचं असल्याचं आणि सर्वप्रथम विठ्ठल साखर कारखान्याची स्थिती सुधारणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केेले. यावेळी ते पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचा उमेदवार घोषित करतील अशी आशा सर्वच कार्यकर्त्यांना होती मात्र भगीरथ भालकेंच्या नावाची घोषणा उपस्थित कार्यकर्त्यांमधून होऊ लागली व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार घोषित करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली यावर शरद पवार यांनी, ‘‘याबाबत तात्काळ कांही बोलणं उचित ठरणार नाही याबाबत चर्चा करण्यासाठी मी पुन्हा येईन, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचे आहे.’’ असे मत व्यक्त केले. पवारांच्या या वक्तव्यानंतर मात्र पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या उमेदवारीबाबतचा सस्पेन्स वाढला आहे.
यावेळी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा पवार करतील, असे कार्यकर्त्यांना वाटलं होतं मात्र, पवार यांनी सांगितलं की, ’आपल्याला एकत्र बसून या विषयावर चर्चा करायची आहे. तत्काळ त्यावर बोलता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे.’ विशेष म्हणजे या शब्दावरच पवार यांनी अधिक जोर दिला. त्यामुळे पंढरपूर मतदार संघातील उमेदवार कोण असणार? हे सध्या गुलदस्त्यात आहे.
Advet.
……………
बोलताना पुढे पवार म्हणाले, की ’विठ्ठल’चे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी मला कारखान्याची माहिती सांगितली आहे. इथली स्थिती काळजी करण्यासारखी आहे. येथे विकासासाठी पहिल्यांदा विठ्ठल कारखान्याकडेच लक्ष केंद्रीत करणार आहे. यावेळी कल्याणराव काळे यांच्या नावाचा त्यांनी अनेकदा उल्लेख केल्याने याबाबतही विविध चर्चेला तालुक्यात उधाण आलेले आहे.
दिवंगत आमदार भारतनाना भालके यांनी वेगवेगळ्या पक्षातून निवडणुक लढवून जिंकूनही दाखवली, परंतु माझ्यावरचे त्यांचे प्रेम कधीच कमी झाले नाही. असेही श्री.पवार म्हणाले. दरम्यान भालके यांच्या कार्यकर्त्यांमधून भगिरथ भालके याची उमेदवारी घोषीत करावी अशी मागणी आहे. आज याबाबत शरद पवार कांहीच बोलले नसल्यामुळे कार्यकर्त्यांना पवार यांच्या पुढच्या दौर्याची प्रतिक्षा लागुन राहिली आहे.


