👁 9 Views

पंढरपूर लाईव्हच्या प्रयत्नांना यश… पुण्यात भरकटलेल्या ‘त्या’ वयोवृध्द ग्रामस्थाची नातेवाईकांकडे सुखरुप रवानगी! पुण्यातील बाळासाहेब पाटील आणि आवाटी गावचे माजी सरपंच संजय नलवडे यांचे बहुमोल योगदान!

Pandharpur Live :- पुण्यात भरकटत असलेल्या करमाळा तालुक्यातील एका वयोवृध्द ग्रामस्थाला त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहचविण्यासाठी यासंदर्भातील वृत्त ठळकपणे प्रसिध्द करुन पंढरपूर लाईव्हने केलेल्या  प्रयत्नाला अखेर यश आले असुन संबंधित वयोवृध्द सुखरुपरित्या आपल्या नातेवाईकांचे घरात पोहोचते करण्यात आले आहे.

 ‘‘करमाळा तालुक्यातील एक वयोवृध्द पुण्यात भरकटत असुन त्यांची काळजी मी सध्या घेत आहे; आपण त्यांचे नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी सहकार्य करा!’’ असा एक कॉल पुणे येथील बाळासाहेब पाटील यांनी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांना पुण्यातून आला. यानंतर संपादक वानखेडे यांनी सविस्तर माहिती घेवून यासंदर्भातले वृत्त ‘पंढरपूर लाईव्ह’ वर ठळकपणे प्रसिध्द केले. पंढरपूर लाईव्हच्या या प्रयत्नाला अखेर यश आले असुन सदर वयोवृध्द ग्रामस्थास पुण्यातील बाळासाब पाटील यांनी त्यांच्या नातेवाईकाकडे सुरक्षितपणे सुपूर्त केले आहे. दामु शिंदे यांचे मानसिक संतुलन ढासळले असुन ते कधी चुकुन आलो आहो,रुसुन आलो आहे, वर्षभर झाले पुण्यात फिरतो आहे असे सांगत होते, पंढरपूर लाईव्हचे वृत्त पाहुन सदर वृध्दाला आपल्या घरी घेवून गेलेले संजय नलवडे हे मुळचे आवाटी येथील असुन पुणे येथे त्यांचा स्वतःचा उद्योग आहे, आवाटी गावचे ते माजी सरपंच आहेत. त्यांनी गावातील शिंदे यांच्या पुतण्याकडे निरोप देऊन दामु शिंदे यांच्या विषयी माहीती दिली आहे. सदर वयोवृध्दास सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोहोच करेपर्यंत त्यांची काळजी घेतलेले पुणे येथील बाळासाहेब पाटील व उद्योजक संजय नलवडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करमाळा तालुक्यातील आवाटी या गावातील दामु शिंदे हे वयोवृद्ध ग्रामस्थ पुणे येथे पिंपरी चिंचवड येथील एका कंपनीसमोर वेड्यासारखे फिरत होते.े कंपनीतील बाळासाहेब पाटील यांनी त्यांना जेवण वगैरे देऊन दिले होते व त्यांचेबद्दलची माहिती पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांना कळवली. यानंतर ‘पंढरपूर लाईव्ह या ई-न्युज पोर्टलवर बातमी प्रसिध्द झाली. सदरची बातमी मुळचे आवाटी माजी सरपंच संजय नलवडे सध्या रा.पुणे) यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी तात्काळ बालासाहेब पाटील यांना कॉल करुन पिंपरी चिचवड येथील संबंधित ठिकाण गाठले.  व आपल्या गावातील वयोवृध्द दामु आबा शिंदे यांना आपल्या फॉर्चुनर गाडीतून स्वत:चे घरी नेवुन सर्व व्यवस्था केली .

Advet.  


……………

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *