👁 8 Views

15 मे नंतर पुन्हा कडक निर्बंध लागु करण्याचे संकेत! पुढच्या आठवड्यात निर्णय

 Pandharpur Live Online: राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे. मात्र काही जिल्ह्यांत कोरोनाची रुगणसंख्या वाढताना दिसत आहे. अशा जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवायचा अथवा नाही याबाबत 15 मे नंतरच निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

‘राज्यात रुग्णांची रोजची संख्या 60 ते 65 हजारांच्या आसपास आहे. अद्याप राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नाही. राज्यातील 12 जिह्यात पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे. तर काही जिल्हय़ांत हा दर स्थिर आहे. काही जिह्यांत कोरोनाचा वाढता दर दिसत आहे.

त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय 15 मेनंतरच घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *