👁 11 Views

26 तलवारी बाळगणाऱ्या तरूणाला पोलिसांनी सापळा रचून केले गजाआड

 Pandharpur Live Online:

वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल 26 तलवारी बाळगणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. फायनान्स कंपनीमध्ये कामाला असताना त्याने इमारतीच्याच छतावर तलवारी ठेवल्याचे दिसून आले आहे. प्रतिक ज्ञानेश्वर भोसले (वय 33, रा. जितोजी अपार्टमेंट, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.


गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी रात्री सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी धनकवडीतील सह्याद्रीनगर परिसरातील एक फायनान्स कार्यालयाच्या छतावर तरुणाने पोत्यामध्ये हत्यारे भरून ठेवली आहेत. संबंधीत तरूण तिथेच असल्याची माहिती हवालदार नीलेश शिवतरे आणि धनंजय ताजणे यांना मिळाली.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार पथकाने सह्याद्रीनगरमधील शिवगंगा अपार्टमेंटमध्ये सापळा रचून प्रतिक भोसले यास ताब्यात घेतले.

    ………………

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    “पंढरपूर लाईव्ह” चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ”जनसामान्यांच्या मनाचा आरसा” @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ………………

त्याच्याकडून पोत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल 26 तलवारी जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनीयमान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आरोपी प्रतीकने मोठ्या प्रमाणात तलवारी कशासाठी गोळा केल्या होत्या. यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी दिली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक जुबेर मुजावर, शाहिद शेख, पोलिस कर्मचारी निलेश शिवतरे, अतुल मेंगे, धनंजय ताजणे, प्रमोद मोहिते, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *