👁 9 Views

पोहनेर-सिरसाळा मेन रोड ची दुरावस्था कधी मिटणार? ग्रामस्थांना करावा लागतोय रात्री-अपरात्रीचा जीवघेणा प्रवास!

       
 पोहनेर (प्रतिनिधी):  पोहनेर-सिरसाळा हा 14 किलोमीटर चा मेन रोड रात्री-अपरात्रीचा प्रवास करताना परिसरात विविध गावातील ग्रामस्थांसा या रस्त्यावरून जाताना ठिकठिकाणचे खड्डे चुकवताना तारेवरची  कसरत करत वाहनधारकांना प्रवास करावा लागतोय. या रोड वरील नागरिकांना तसेच प्रवाशांना तसेच या पोहनेर पंचायत समिती गणातील शासकीय सेवा देण्यासाठी येणाऱ्या अधिकारी यांना हा रस्ता खुप मोठी डोकेदुखी होऊन बसलाय!

Viral Video : पुण्य बुडालं पाप झालं लयी; जगात खरं न्हाई न वागणं बरं न्हाई! आज्जीबाईचा भन्नाट व्हिडीओ

……………..

……………..

…………………

पोहनेर -सिरसाळा मेन रोड करणार तरी कोण? 

चार -पाच महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचा महासंग्राम सुरू होईल; पण पोहनेर पंचायत समिती गणात प्रचार करण्यासाठी कोणकोणते इच्छुक  उमेदवार असतील? अगोदर पंचायत समिती गण पोहनेरचा दौरा कोण करणार? आणि या मार्गदुरूस्तीच्या जनहिताच्या प्रश्नाची आपल्या लोकनेत्यांकडुन कोण सोडवणूक करुन घेणार? याची कुजबुज सध्या पोहनेर गणातील जनतेमध्ये चांगलीच रंगलीय. 

 मागील काही निवडणूक प्रचारादरम्यान काही मान्यवर नेत्यांनी हा रस्ता कायमस्वरूपी टकाटक करू,  या मार्गावरून प्रवास करताना पोटातील पाणी सुध्दा हलणार नाही! असा हा रस्ता करून देवू असे आश्वासन पोहनेर गणातील ग्रामस्थांना दिले होते. हा रस्ता मागील काळात दुरूस्तही झाला पण तो निकृष्ट दर्जाचा झाल्याने पुन्हा हा हा रस्ता पुर्णपणे खड्डेमय झाला आहे.

…………….

…….

…………….

…………….

……………..

 या रस्त्यावर दोन छोट्या नद्या तसेच एक मोठी गोदावरी नदी आहे. या नदी वरील पुलांवर संरक्षक कठडे देखील नाहीत. त्यामुळे या नदीच्या ठिकाणी भविष्यात खुप मोठा धोका संभवतो.  या रस्त्यावरुन नेहमीच खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना  तसेच नागरिकांना मनक्याचे आजार उद्भवत आहेत. या रस्त्यावरील पोहनेर नजीकचे किमान तीन मोठे खड्डे बुजवून घेणे अत्यावश्यक आहे.   हा रस्ता दुरूस्त करण्यासाठी काही तरी पर्याय काढावा, या रस्त्यावरुन पुढील दोन -तीन महिन्यात शेतकऱ्यांचा ऊस साखर कारखान्याकडे जाणार आहे. त्वरीत रस्त्याचे काम झाले नाही तर शेतकरी वर्गाचे नुकसान होणार आहे.

या रस्त्यावरून एस टी महामंडळाच्या बसची नियमित वाहतूक होते. परंतु रस्त्याच्या दुरावस्थेमुळे महामंडळाच्या बस सुध्दा खराब होत आहेत. त्यामुळे बस फेर्‍या कमी प्रमाणात होत आहेत. या रस्तामुळे त्यामुळे वयोवृद्ध ग्रामस्थांना शहराकडे दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी जास्त पैसे देऊन खाजगी वाहनातून प्रवास प्रवास करावा लागतोय. या रस्त्याच्या प्रश्ना संदर्भात लोकप्रतिनिधी जागे होतील का? की संबंधित प्रशासकीय अधिकारी व नेतेमंडळी एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करत आहेत का ? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *