👁 10 Views

तुकाराम मुंढेंसारखे डोक्यावर बर्फ ठेऊन काम करा ,आत्महत्येचा विचार चुकीचा -अण्णांनी केले ज्योती देवरे यांचे समुपदेशन


आज ज्योती देवरे या आदरणीय अण्णासाहेब हजारे याना भेटण्यासाठी राळेगण या ठिकाणी गेल्या अण्णासाहेब हजारे यांनी आधी हा विशय लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा आहे मी यात बोलू शकत नाही असे म्हणून बोलण्यास नकार दिला.

परंतु तहसीलदार देवरे यांनी एक महिला म्हणून माझी व्यथा ऐकून घ्यावी अशी गळ घातली आणि अण्णांनी जवळपास 1 तास तहसीलदार देवरे यांचे समुपदेशन केले.

आपण कर्तव्यदक्ष आहात महिला आहेत खंबीर आहात आत्महत्येचा विचार सोडून द्या खंबीर राहा ,तुकाराम मुंढे यांचा उल्लेख करत ,त्यांच्यासारखे वरिष्ठ अधिकार्यांना तर किती त्रास होतो ते पहा डोक्यावर बर्फ ठेवा. जर तुम्ही निर्दोष असाल तर नक्कीच चौकशीत ते सिद्ध होईल धीर धरा असा सल्ला आदरणीय अण्णांनी तहसीलदार देवरे याना दिला.

परंतु काही खोडसाळ पोर्टल ने अण्णांनी तहसीलदार देवरे यांचं म्हणणं ऐकलं नाही असा गैरसमज पसरवुन एक कर्तव्य दक्ष अधिकारी, जी महीला असुन अंत्यंत जबाबदारी चे भाव ठेवून काम करत असताना ,अशा अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असेल तर त्याचा सर्व थरातील जनतेने विरोध केला पाहिजे , दोन अडीच महिन्यांपूर्वी कोरोणात दगावलेल्या वयोवृद्ध नागरिकांच्या प्रेताला अग्नीढाग देण्यासाठी त्यांचे वारसदार अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळेत येवु शकते नाहीत अशा दूखंद प्रंसगी स्वतः महीला असुनही अग्नी डाग देउन आपल्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली होती , त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून त्या घटने बद्धल आदरयुक्त कौतुक केले गेले , लोक प्रतिनिधी समोर काम करत असताना काही उनिवा राहु शकतात ,त्या उनिवांचे समोरासमोर बसून निराकरण करणे गरजेचे असते ,ते न करता एकदम टार्गेट करून बदनामी करने योग्य नसल्याचे समाजातील अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी मत व्यक्त केले आहे,

तालुक्यात हे जे घडते आहे हे चुकीचे आहे आणि दोन्ही बाजुनी संयम ठेवावा असेही अण्णांनी सांगितले 

काल देखील याबाबत चौकशी अंती बोलू असे अण्णांनी सांगितले परंतु अतिशय चुकीच्या बातम्या अण्णांच्या तोंडी घालण्याचे काम सध्या सुरु आहे 

तहसीलदार देवरे यांनी जवळपास 1 तास त्यांना कशाप्रकारे त्रास दिला जातो आहे याबद्दल अण्णांकडे तक्रार केली , याबाबत सर्व स्तरातील सुजान नागरिकांनी अशा कर्तव्य दक्ष महीला अधीकांऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

प्रतिक्रिया ्  कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक असलेल्या पारनेर तालुक्याच्या तहसील दार यांना , लोक प्रतिनिधी व वरीष्टा कडुन धमक्या , तसेच राजकीय हस्ती च्या सांगण्यावरून धमकावले जाते , त्यांना टार्गेट करून त्यांच्या कार्यालयात जाऊन अरेरावी,शिविगाळ , करून अपमानित करून सतावले जाते ,हे अयोग्य आहे , अधिकारी व लोक प्रतिनिधी यांनी सामोपचाराने तोडगा काढला असता तर , जबाबदार महीला अधिकाऱ्यांवर नैराश्यातुन ,सोसाइड, करण्या इतपत मानसिकता तयार झाली नसती , अजुन ही वेळ  गेलेली नाही  सन्मानिय  लोक प्रतिनिधी व संबंधित महिला अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सामोपचाराने गैरसमज दूर करून तोडगा काढावा ््कुबेर जाधव , सामाजिक कार्यकर्ता , देवळा नाशिक ,,

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *