……………………………….
Lord Vitthal | श्रावण सोमवार समाप्ती निमीत्त श्रीविठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात फुलांची आरास
………………………………………
Pandharpur Live Online: देशात कोरोनाचे लसीकरण मोठय़ाप्रमाणात सुरू असतानाच आता बनावट लसींचे टेन्शन आले आहे. अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या बनावट लसी आढळून आल्या आहेत. त्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांना लस देण्याआधी ती बनावट तर नाही ना याची खातरजमा करावी, असे निर्देश दिले आहेत. तसेच कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही या लसींची सत्यता पडताळण्यासाठी अवश्यक असलेली माहिती पाठवली आहे.

जगभरात कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने वाढत असून अमेरिकेत तिसरी लाट सुरू झाली आहे, तर हिंदुस्थानात लावकरच तिसरी लाट येईल, असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकारकडून कोरोना लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे. याचा लस माफियांकडून गैरफायदा घेण्यास सुरुवात केली असून हुबेहूब पॅकिंग असलेल्या बनावट लसी उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे कोणती लस खरी आणि कोणती खोटी, असा प्रश्न तज्ञांपासून सामान्यांपर्यंत सर्वांना पडत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बनावट लसींपासून सावध राहण्याचा इशारा देतानाच ती कशी ओळखावी याची माहिती राज्यांना दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडूनही बनावट लसीबाबत इशारा
दक्षिण पूर्व अशिया आणि आफ्रिकेत अॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्डची कोविशिल्ड ही बनावट लस आढळून आली आहे. त्यामुळे बनावट लसींबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सर्व देशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

खरी लस कशी ओळखणार
कोविशिल्ड
कोविशिल्डची खरी लस ओळखण्यासाठी लसीच्या बाटलीवर खालील माहिती पहावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाचे (एसआयएस) प्रोडक्ट लेबल पहावे.
ट्रेडमार्कसोबत ब्रँड (कोव्हिशिल्ड) नाव असेल.
जनेरिक नावाचा शब्द बोल्ड नसेल.
लेबल गडद हिरव्या रंगाचे असेल आणि त्यावर अॅल्युमिनिअम क्लिपचे सील असेल.
सीजीएस नॉट फॉर सेल असा शिक्का असेल.
कोव्हॅक्सिन
कोव्हॅक्सिनची खरी लस ओळखण्यासाठी या माहितीची पडताळणी करावी.
लसीच्या बाटलीवर यूव्ही हेलिक्स (डीएनएसारखी संरचना) असेल, सदरचे चित्र अल्ट्रा व्हायलेट प्रकाशात पाहता येते.
कोव्हॅक्सिनवरील एक्स हे इंग्रजी अक्षर हिरव्या रंगाच्या इफेक्टमध्ये दिसेल.
कोव्हॅक्सिन स्पेलिंगमध्ये होलोग्राफिक इफेक्ट दिसेल.

