Pandharpur Live: पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील ‘‘श्री’’ ची आज दि. 12 सप्टेंबर 2021 रोजीची सायंकाळची पुजा व आरती पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे कॅम्पस डायरेक्टर डॉ.कैलास करांडे सर यांच्या शुभहस्ते विधीवत संपन्न झाली. पौरोहित्य विक्रांत विप्र यांनी केले.
यावेळी डॉ.कैलास करांडे सर यांनी पंढरपूर लाईव्हला च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी व विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
लवकरात लवकर संपुर्ण जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांना सुख, शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभु दे! अशी प्रार्थनाही यावेळी डॉ.श्री.कैलास करांडे सर यांनी विघ्नहर्त्या गणरायाकडे केली. यावेळी प्रा.डॉ.एस.जी. देशमुख, पंढरपूर लाईव्ह प्रतिनिधी हर्षद कोळी आदी उपस्थित होते.





