👁 9 Views

पळून गेलेले अल्पवयीन प्रेमीयुगुल ताब्यात मोबाईल लोकेशनमुळे लागला शोध

 कमेकांच्या प्रेमात वेडे होऊन 20 दिवसांपूर्वी घरून पळून गेलेल्या अल्पवयीन प्रेमीयुगुलाला नगर तालुका पोलिसांनी दौंड तालुक्यातील यवत येथून ताब्यात घेतले आहे. मुलगा आणि मुलगी हे दोघेही अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी नगरमधील बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.


नगर तालुक्यातील हातवळण येथील एका अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने 10 सप्टेंबर रोजी अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबीयांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज चव्हाण तपास करत होते. तपासादरम्यान या मुलीचे अपहरण नगर तालुक्यातील मठ पिंप्री गावातील तरुणाने केले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करत तपास सुरू केला. त्या मुलाकडे असलेल्या मोबाईलची माहिती पोलिसांना मिळाली.


दोन दिवसांपूर्वी या मुलाच्या मोबाईलचे लोकेशन दौंड (जि. पुणे) जवळील यवत या ठिकाणी आढळून आले. त्यानंतर लगेच पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस नाईक आर. एस. खेडकर, घावटे, बांगर, सहायक फौजदार घोरपडे यांचे पथक दौंडकडे रवाना झाले. रविवारी (दि.2) यवत परिसरात शोध घेऊन त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, आमचे एकमेकांवर प्रेम असल्याने आम्ही दोघे घरून पळून आल्याचे त्यांनी सांगितले. ते दोघेही अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्यांना नगरला आणून त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *