👁 9 Views

मुलींचे कपडे घालणं भोवलं, शिव्या, लाठ्या , लाथा आणि दे दणादण बुक्के , कुठे झाला राडा

 मुलं चोरणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरल्यात. त्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात याच संशयातून अनेकांना मारहाण करण्यात आली.


तशा घटना नाशिक , सांगली, जळगाव येथून समोरही आल्या होत्या. दरम्यान, आता पुण्यातही  एका व्यक्तीला जबर मारहाण  करण्यात आल्याची घटना उघडकीस आलीय. ही व्यक्ती मुलीच्या वेशात फिरत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर काही तरुणांनी या व्यक्तीला जाब विचारला. पण नीट उत्तरं न देता आल्यानं अखेर या व्यक्तीला तरुणांनी जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही रेकॉर्ड केला.


पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. चकीत करणारी बाब म्हणजे ही व्यक्ती मुलीच्या वेशात होती. या व्यक्तीला काही तरुणांनी जाब विचारला आणि त्यानंतर त्याला मारण्यास सुरुवात केली. शिव्या, लाथा, बुक्के आणि काठ्यांनी या व्यक्तीला अमानुष मारहाण करण्यात आली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *