👁 8 Views

विवाहित भाच्यावर जडल प्रेम , महिलेला गावकऱ्यांनी दिली आयुष्यभराची शिक्षा

 गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली आहे. अनैतिक संबंध, प्रेमप्रकरणं या गोष्टींमुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. पश्चिम बंगालमध्ये मालदा येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली आहे.


तसंच या महिलेचे केस कापून तिची धिंडदेखील काढण्यात आली. यामुळे पुरतुली परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. `आज तक`ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. पश्चिम बंगालमधल्या मालदा येथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका महिलेचे केस कापून तिची धिंड काढण्यात आली.



तसंच तिला मारहाणदेखील करण्यात आली आहे. पुरतुली भागात ही घटना घडली. विवाहित भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप या महिलेवर आहे. या विवाहित भाच्याने काही दिवसांपूर्वी नैराश्यातून आत्महत्या केली आहे.


युवकाने आत्महत्या केल्यानंतर ही महिला फरार झाली होती. आत्महत्या केलेल्या युवकाची पत्नी आणि कुटुंबीयांनी  महिलेला पकडलं. पतीच्या निधनामुळे संतापलेल्या पत्नीने आणि कुटुंबीयांनी या महिलेला बेदम मारहाण केली. तसंच तिचे केस कापून तिची धिंड काढली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *