👁 8 Views

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे अन्यथा मराठा मुले नक्षलवादी बनतील- शिवस्वराज्य युवा संघटनेचा इशारा

राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार आहे.त्यांनी ठरवले तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा निर्णय होऊ शकतो.त्यामुळे आता खोटे बोलणे बंद करा आणि प्रत्यक्षात कृती करावी.


मराठा मुलांना व मुलींना नोकरी मिळाली नाही तर मराठा मुले व मुली नक्षलवादी होऊन सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडतील.असा इशाराच दिला.गेल्या २७वर्षापासून छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै.आण्णासाहेब जावळे पाटील आणि मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब पाटील,यांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्ची घातले


 आहे.४८मराठा तरूणांनी बलिदान दिले.अहिंसा व लोकशाही मार्गाने ५८मोर्चे निघाले.तरी सरकारला कळत नसेल तर आगामी काळात ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत सांगण्यासाठी १लाख मराठा समाजातील मावळे मुंबईला जाणासाठी त्यांचे नियोजन आतापासूनच सुरू करणार आहे


त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचे मेळावे घेतले जाणार आहेत.आता यापुढे फक्त मराठा आरक्षण हेच धोरण घेऊन पुढील दिक्षा ठरवली जाणार असे ही शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी म्हटले आहे.


आता उठा मराठ्यांनो जागे व्हा,आपल्या हक्काचे आरक्षण घ्या.आता नाहीतर परत कधीच नाही.असे संदिपराजे मुटकुळे-पाटील म्हणाले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *