👁 4 Views

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या राणी चोरमोले चे “आविष्कार” मध्ये यश.*

Pandharpur Live News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटी लोणेरे अंतर्गत घेण्यात आलेल्या विभागस्तरीय “आविष्कार२०२३-२४” या प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील राणी चोरमोले या विद्यार्थिनीने इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी या विभागामध्ये कांस्य पदक मिळवून कर्मयोगीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ही स्पर्धा पुणे येथील के बी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासेट्युकल एज्यूकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे येथे पार पडली.

महाविद्यालय स्तरावर पार पाडलेल्या प्राथमिक फेरीमध्ये दीडशे हून अधिक विद्यार्थ्यांमध्ये सर्वोत्तम बारा विद्यार्थ्यांची विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. पुणे येथे पार पाडलेल्या विभागस्तरीय स्पर्धेमध्ये राणी चोरमोले या विद्यार्थिनीने कांस्य पदक पटकावून विद्यापीठ स्तरीय होणार्‍या फेरीमध्ये प्रवेश मिळविला आहे. राणी चोरमोले ही सध्या कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागामध्ये द्वितीय वर्षा मध्ये शिकत आहे.
..,………………………………….
Pandharpur Live News युट्युब चॅनल वरील  आजच्या बातम्यांचे व्हिडिओ बघा👇 

………………………………………
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता व महाविद्यालयाचे “आविष्कार”चे समन्वयक डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी, विभागप्रमुख प्रा. अनिल बाबर, प्रा. राहुल पांचाळ, प्रा. एस एम लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने व इतर सर्व प्राध्यापकांनी राणी चोरमोले चे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धेसाठी प्रा. एम एम गुंड, प्रा. रमेश हलचेरिकर, प्रा.आर जे भोसले, प्रा. दीप्ती कुलकर्णी प्रा. ए म सुतार आदी प्राध्यापकांचे विशेष सहकार्य लाभले

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *