👁 7 Views

कपाटाच्या आवाजाने जाग आली आणि घरच्या लक्ष्मीने घेतलं दुर्गेच रूप

 लक्ष्मीपूजनाच्या दिवशी चोरी करण्याचा प्रयत्न पुणे जिल्ह्यातील मावळ येथे फसला.

एका कॉलनीतील घरात शिरुन 5 चोरट्यांनी चोरीचा कट रचला होता. पण कपाटाचा आवाज झाल्यानं घरातील महिलेला जाग आली. तिने आवाजाच्या दिशेने जात चोरांचा थरारक पाठलाग केला. इतक्यात चोरांनी तिथून धूम ठोकली. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यामुळे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ करण्याचं सोरांनं स्वप्न गृहिणीच्या सतर्कतेमुळे अधुरं राहिलंय.


मावळमधील तळेगाव दाभाडे येथे कडोलकर कॉलनी आहे. या कॉलनीत धनंजय वाडेकर आपल्या पत्नीसह राहतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाडेकर यांच्या घरामध्ये चोरी करण्याच्या इराद्याने चोर शिरले. पण चोरी करताना झालेल्या कपाट्या आवाजामुळे चोरीचा बेत फसला.


एकूण पाच चोर धनंजय यांच्या घरात शिरले होते. चोरांना कपाड उघडण्याचा प्रयत्न केला. कपाटाच्या आवाजाने धनंजय वाडेकर यांच्या पत्नीला जाग आली. त्याने कपाटाचा आवाजा ज्या दिशेने आला, त्या दिशेनं त्या आवाज करत गेल्या. चोर दिसताच त्या पाठलाग करुन लागल्या. मात्र चोरांनी तिथून धूम ठोकली.


सुदैवानं वाडेकर यांच्या घरामधील कोणतेही सोन्याचे दागिने, रोख रक्कम चोरीला गेली नाही. त्यामुळे वाडेकर कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाडेकर यांच्या धाडसामुळे चोरांना घाम फुटला होता. सध्या मावळमध्ये वाडेकर यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय.


दरम्यान, या घटनेप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांना कळवण्यात आलं आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अधिक तपास पोलिसांकडून केला जातोय. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरातील इतर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहनही केलं जातंय.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *