👁 6 Views

नोकरावर आला जीव , पित्याने केला विरोध ; तरुणीचं बापासोबत भयानक कांड

 

देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्याच पित्याचा खून केला आहे.


पश्‍चिम उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भयानक घटना समोर आली आहे. कलियुगातील एका तरुणीने आपल्या प्रियकरासह मिळून आपल्याच वडिलांची हत्या केली. 


तसेच हत्येनंतर वडिलांचा मृतदेह आधी दोन दिवस घरात लपवून ठेवला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ट्यूबवेलमध्ये खड्डा खोदून मृतदेह पुरला.


ही धक्कादायक घटना मेरठच्या बहसूमा परिसरातील राहवती गावातील आहे. मृत सत्यभानची सावत्र मुलगी सिमरन हिचा जीव तिच्याच घरातील नोकर आशिषवर जडला होता. 


त्यानंतर आशिष आणि सिमरनची प्रेमकहाणीबद्दल वडिलांना समजताच ते संतापले. वडिल सत्यभान यांनी सावत्र मुलगी सिमरनला मारहाण केली.

या मारहाणीमुळे सिमरन भडकली आणि तिने वडिलांच्या खुनाचा कट रचला. त्यानंतर रात्री आशिष आणि सिमरनने वडिलांचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह पेंढ्याच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला. 


मात्र, दोन दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागल्याने ट्रॅक्टरवर लोड केल्यानंतर मृतदेह ट्यूबवेलमध्ये पुरण्यात आला. मात्र, हा संपूर्ण प्रकार गावकऱ्यांना समजल्यावर खळबळ उडाली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *