👁 7 Views

दोन एस टी समोरासमोर धडकल्या, अपघातात20 ते 25 प्रवासी जखमी

 

पालघर जिल्ह्यातून अपघाताची एक भंयकर घटना समोर आली आहे. पालघरच्या जव्हारमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर भीषण अपघात झाला आहे.


या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. 


अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.


जखमींना तातडीने जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, नाशिक सिलवासा आणि जळगाव सिलवासा या दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या.


 आज सकाळच्या सुमारास जव्हार सिल्वासा मार्गावरील जयसागर डॅमजवळ हा अपघात झाला आहे.

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही एसटी बस अक्षरश: चिरडल्या गेल्या. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दोन्ही बसमधील 20 ते 25 प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती आहे. 


अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं. जखमींवर सध्या जव्हार येथील पतंगशाहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *