👁 7 Views

भरदिवसा चोरट्यांनी नगरसेविकेवर केला चाकू हल्ला


 लोणंद- निंबोडी रस्त्यावर मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात तिघा चोरट्यांनी लोणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती राहुल घाडगे यांच्यावर भरदिवसा चाकू हल्ला केला. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, पर्स, मोबाईल, रोख रक्कमेसह सुमारे लाखांचा ऐवज लंपास केला.


घटना आज, सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास घडली. याप्रकाराने लोणंदमध्ये खळबळ उडाली आहे.


याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, नगरसेविका तृप्ती घाडगे या निंबोडी रोडवरील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मिटिंगसाठी आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या.


 त्यावेळी त्यांचा विनानंबरच्या मोटरसायकलवरील तीन युवकांनी पाठलाग केला. निंबोडी रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून घाडगे यांना थांबवले. यावेळी त्यांनी आरडाओरडा केली. मात्र रस्त्यावर कोणी नव्हते.

दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेतले. गाडीला अडकवलेला मोबाईल, रोख रक्कम असलेली पर्स ओढली. 


यावेळी प्रतिकार करताना त्यांच्या हातावर चाकूचा वार केला. चोरटे पळून जाताना त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. परंतु यावेळी रस्तावर कोणीच नसल्याने चोरटे निंबोडी फाट्या नजीकच्या रस्त्याने कापडगावच्या दिशेने पळून गेले. 


घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर व सहकारी, घटनास्थळी दाखल झाले. तृप्ती घाडगे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *