👁 8 Views

पंढरपूर सिंहगड मध्ये “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” संपन्न

पंढरपूर: पुढारी वृत्तसेवा 

कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये रोटरी क्लब व सिंहगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने “स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन” या विषयावर  प्रा. आनंद बिराजदार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.


    महाविद्यालयात आयोजित केल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे   मार्गदर्शक प्रा. आनंद बिराजदार यांचे स्वागत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. 


   यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. आनंद बिराजदार म्हणाले, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करायचा? याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कोणी करावा? या शिवाय कोणत्या-विषयांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. 


स्पर्धा परीक्षेत प्रश्नांचे स्वरूप कसे असते. वेगवेगळया विषयांचा आणि चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविण्यासाठी काय करावे. या सर्व प्रश्नांवर विद्यार्थ्यांना प्रा. आनंद बिराजदार यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर प्रा. बिराजदार यांनी समर्पक उत्तरे दिली.


     या व्याख्यानात महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग, सिव्हिल इंजिनिअरींग आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. 

   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अभिजित सवासे, सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील प्रा. शेखर पाटील, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. धनंजय गिराम आणि इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील प्रा. नागनाथ खांडेकर आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अभिजित सवासे यांनी केले.


फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित स्पर्धेत परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व इतर.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *