👁 9 Views

पंढरपुरातील समाजसेवक ओंकार बसवंती यांना पितृशोक, कामगार नेते शिवानंद बसवंती यांचं दु:खद निधन


पंढरपूर येथील समाजसेवक ओंकार बसवंती यांचे वडील कामगार नेते, ख्यातनाम गायक, संगीतप्रेमी शिवानंद बसवंती (वय ७५) यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. 


शिवानंद स्वामी हे कामगार चळवळीतील धडाडीचे कामगार नेते होते. त्यांनी सोलापूर व पंढरपूर येथे मंगलकार्यालयही सुरू केले होते. यासोबतच त्यांना संगीताचीही विशेष आवड होती, ते गिटार उत्तम वाजवत व सुरेल गायनही करत असत.

त्यांच्या रूपाने सोलापुरातील एक धडाडीचा कामगार नेता, संगीतप्रेमी आणि माणुसकीचं नातं जोडणारा हरहुन्नरी माणुस आपली इहलोकीची यात्रा आज संपवला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, दोन सूना आणि नातवंडं असा मोठा परिवार आहे.

पंढरपूर लाईव्ह व वानखेडे परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *