सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिहारा पंचायतीच्या कितासोटी खुर्द गावात ही घटना घडलीये.
दारूच्या नशेत 55 वर्षीय बिरजलाल राम भुयान हे धरणातून बाहेर पडणाऱ्या कालव्याच्या उथळ पाण्यात मासेमारी करण्यासाठी गेले होते.
45 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, एक तरुण त्या व्यक्तीच्या गळ्यातील अजगर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. तो अजगराला पकडून ओढतोय.
पण हा महाकाय साप केवळ त्या माणसाला काय सोडायला तयार नसतो, तर तो अधिक ताकदीने मान पकडत राहतो. मग दुसरा माणूस येतो आणि मदत करू लागतो, पण दोघांच्या सर्व
प्रयत्नांनंतरही अजगर त्या माणसाच्या गळ्यात गुंडाळला जातो. हा अजगर काढण्यासाठी काही लोक तरुणाला विविध प्रकारचे सल्ले देत आहेत.





