👁 7 Views

मेकअपसाठी गेलेल्या पत्नीला मारहाण

 

दुसर्‍या महिलेचा मेकअप करण्यासाठी गेलेल्या पत्नीवर संशय घेऊन मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली.


 याप्रकरणी सुतारदरा येथील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी 35 वर्षीय महिला या पोळी-भाजी केंद्रात काम करतात.


अधिकचे पैसे मिळावेत, यासाठी त्या वेळ मिळेल त्यानुसार ब्युटीपार्लरचेही काम करतात. 


असेच एक काम आल्याने त्या ग्राहकाच्या घरी मेकअप करण्यासाठी गेल्या होत्या. 

त्यांच्या पतीने संशय घेत त्या काम करीत असलेल्या पोळी-भाजी केंद्रावर जाऊन मारहाण केली.


पत्नीचे केस पकडून डोके जमिनीवर आपटले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. 

महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक यादव तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *