👁 9 Views

महिला अंघोळ करताना मोबाईलमध्ये केले चित्रण

 

अंघोळीसाठी गेलेल्या महिलेचे मोबाइलमध्ये चित्रण केले. मनास लज्जा उत्पन्न होईल,


 असे कृत्य करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केले.


पिंपरी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.


नितीन शाम शिंदे (वय १९, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. १६) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घराच्या बाथरुममध्ये अंघोळीसाठी गेल्या.

 त्यावेळी आरोपीने फिर्यादी महिलेच्या बाथरुमच्या खिडकीत बाहेरच्या बाजूने मोबाईल फोन ऑन करून ठेवून मोबाइलमधून चोरून चित्रण केले.


 त्यामुळे फिर्यादी महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन तिचा विनयभंग झाला, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे तपास करीत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *