रेल्वे सुरक्षा बलाच्या कुर्डूवाडी येथील कार्यालयात कर्तव्यावर
असलेल्या एका जवानाने पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
हुसेन दावलसाहेब पिंजार (वय ५२) असे आत्महत्या केलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाचे नाव आहे.
त्यांच्या छातीवर गोळी लागून आरपार गेली आणि छातीतून बाहेर पडून खुर्ची आणि त्या मागच्या भिंतीत घुसल्याचे दिसून आले.
त्यांच्या आत्महत्येमागचे कारण लगेचच समजू शकले नाही.
यासंदर्भात निरीक्षक संदीप हुडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कुर्डूवाडी रेल्वे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.





