औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर रोडवरील कायगाव जवळ दोन कारचा भीषण अपघात झाला. स्विफ्ट आणि वॅग्नर कार एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाल्याची प्रधमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात एव्हढा भीषण होता की दोन्हीही कारचा चुराडा झाला आहे.
अपघातातील स्विफ्ट कार औरंगाबादमधील बजाज नगर येथील तर वॅग्नर कार अमरावती येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अपघातानंतर मृत आणि जखमींना गंगापूर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत.
या अपघातात बजाज नगर येथील स्विफ्ट कार मधील चार जणांचा जागेवर मृत्यू झाला. यामध्ये रावसाहेब मोटे सुधीर पाटील, महानगर रतन बेडवाल यांच्यासह एकाचा समावेश आहे.





