👁 7 Views

लग्नास नकार दिल्याने शाळकरी मुलीला चाकूने भोसकले

 

लग्न करण्यास नकार दिल्याने एका 16 वर्षांच्या शाळकरी मुलीला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना साताऱयात घडली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओडिशा राज्यातील एका तरुणाला अटक केली आहे.


विवेक नरहरी शेट्टी (वय 23, मूळ रा. राज्य ओडिशा, सध्या रा. करंजे पेठ, सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.


पीडित 16 वर्षांची मुलगी बुधवारी (दि. 23) सायंकाळी साडेपाच वाजता अपार्टमेंटच्या टेरेसवर अभ्यास करत होती. त्यावेळी विवेक हा तेथे गेला. 


‘तुझे माझ्यावर प्रेम आहे का, मला आत्ता सांग आणि तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही ते पण सांग’, असे त्याने पीडित मुलीला विचारले. यावर मुलीने ‘अजून मी लहान आहे. मला अजून शिकायचे आहे. 


माझ्या आई-वडिलांना असे काही केलेले आवडणार नाही. म्हणून, मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही’, असे उत्तर दिले. त्यामुळे चिडून जाऊन विवेक शेट्टीने तिला जवळ ओढून तिच्या गळय़ावर आणि पोटात चाकूने वार केले.

मुलीने आरडाओरडा केल्याने अपार्टमेंटमधील नागरिक तिच्या मदतीसाठी धावून आले. 


तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल केले.

 दोन दिवस पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक होती. तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. शाहूपुरी पोलिसांनी विवेक शेट्टीवर गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *