👁 8 Views

डोळ्यात पाणी आणणारी घटना,3 महिन्याच्या चिमुकलीसह आईचा अपघातात जागीच मृत्यू

 

राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुर-मौदा महामार्गावर आज दुपारी भीषण अपघात झाला.


अपघातात तीन महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. 


नागपूर मौदा महामार्गावर आज दुपारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार तीन महिन्याच्या चिमुकलीचा आणि तिच्या आईचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. 


तर वडील राजहंस वाघमारे आणि त्यांची आई अपघातात गंभीर जखमी झाले आहे.


मौदा येथील रबडीवाला चौकात अपघातानंतर काही काळ ट्रॅफिक जाम झाला होता. 

घटनेची माहिती मिळताच, मौदा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केलं. 


तर आरोपी ड्रायव्हरला ताब्यात घेतलं आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *