माणसाला मृत्यू कुठे, कसा आणि कधी येईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. उत्तर प्रदेश राज्यातील मेरठ येथील किदवाईतील अहमद नगर येथे अशीच एक घटना घडली आहे.
व्हिडिओत पाहायला मिळते की, चार तरुण एका गटाने एका गल्लीतून असलेल्या रस्त्याने निघाले होते. हे चौघेही एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे सांगितले जात आहे.
रस्त्यावरुन जाताना एकमेकांशी गप्पामारत निघालेले हे तरुण सीसीटीव्ही फुटेजमध्येही पाहायला मिळतात. दरम्यान, गल्लीतून जात असतानाच अचानक एक तरुण अचानक खाली कोसळतो. त्याचे मित्र त्याला काय झाले म्हणून पाहतात तर तो निपचीत पडलेला दिसतो. त्याची काहीच हालचाल होताना दिसत नाही.
अचानक घडलेल्या या अनुचित प्रकारामुळे बाकीचे तीन मित्रही जोरदार घाबरतात. त्यांना धक्का बसतो. घाबरलेल्या आवस्थेतच ते खाली पडलेल्या मित्राला आवाज देतात.
उठविण्याचा, उचलण्याचा प्रयत्न करतात. पण खाली कोसळलेल्या मित्राकडून कोणताच प्रतिसाद येत नाही. अखेर ते त्याला दवाखान्यात घेऊन जातात. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच या तरुणाला मृत घोषीत केले.





