👁 6 Views

अपघातात तीन तरुणांचा मृत्यु

 

शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावरील दुभाजकावर भरधाव दुचाकी धडकल्याने दोन तरुण मित्रांचा मोटारीखाली सापडल्याने मृ़त्यू झाला. दुसऱ्या अपघातात अजिंठा चौफुलीवर मालमोटारीखाली सापडल्याने तरुणाचा म़ृत्यू झाला.


याप्रकरणी तालुका व एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


शहरातील गुजराल पेट्रोलपंपाजवळील उड्डाणपुलावरील दुभाजकावर भरधाव दुचाकी आदळून मयूर लंके-साळुंखे (१९, रा. पथराड, ता. धरणगाव), दीपक पाटील (२१, रा. बोरखेडा, ता. धरणगाव) हे दोघे मित्र मोटारीखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अजिंठा चौफुलीवर भरधाव मालमोटारीने नगीन राठोड (३८, रा. एमआयडीसी) याला चिरडले.


 शहरातील एमआयडीसी भागातील रहिवासी नगीन राठोड आणि उदय राठोड हे कामानिमित्त सुनसगाव येथे गेले होते. काम आटोपून जळगावात आल्यानंतर शनिवारी रात्री आठच्या सुमारास अजिंठा चौफुलीवर थांबलेले असताना आकाशवाणीकडून भुसावळकडे जाणार्‍या मालमोटारीने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात नगीनचा म़त्यू झाला, तर उदय राठोड गंभीर जखमी झाला.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *